भारताचा कर्णधार विराट कोहली याने ICC Test Rankings च्या फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड या कसोटी सामन्यांच्या निकालानंतर ICC कडून ताजी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला फटका बसला आहे.

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू ICC च्या विरोधात, कारण…

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात द्विशतक ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात विजय मिळवला. लाबूशेनला सामनावीराचा आणि मालिकाविराचा किताब देण्यात आला. त्याच्या चांगल्या खेळीचा त्याला क्रमवारीतदेखील फायदा झाला. ICC Test Rankings मध्ये फलंदाजांच्या यादीत लाबूशेन दमदार भरारी घेत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. आता त्याच्या पुढे केवळ स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे दोन फलंदाज आहेत. विराट कोहली सध्या ९२८ गुणांसह अव्वल आहे, तर स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

ताज्या यादीत भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला फटका बसला आहे. पुजाराची एका स्थानाने घसरण होऊन तो ७९१ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे, तर अजिंक्य रहाणेची दोन स्थानांनी घसरण होऊन तो ७५९ गुणांसह नवव्या स्थानी पोहोचला आहे.

“नुसत्या कल्पना नकोत, जरा विचार पण करा” मुंबईकर माजी क्रिकेटपटूनं ICC ला सुनावलं

ICC Test Rankings च्या गोलंदाजीच्या क्रमवारीत फारसा उलटफेर झालेला नाही. भारताचा जसप्रीत बुमराह सहाव्या, रविचंद्रन अश्विन नवव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानी कायम आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा दुसऱ्या स्थानी कायम आहे.