श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत २-० ने बाजी मारल्यानंतर, विराट कोहलीचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावरील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या हक्काच्या सलामीच्या जोडीने सामन्याची सुरुवात केली.

मात्र संघाला मोठी सुरुवात करुन देण्यात ही जोडी अपयशी ठरली. लंकेविरुद्ध मालिकेत विश्रांती घेऊन संघात परतललेला रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि शिखरमध्ये १३ धावांची भागीदारी झाली. या छोटेखानी खेळीदरम्यानही रोहित-शिखर जोडीने विक्रम करत मानाच्या यादीत स्थान पटकावलं आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे वन-डे संघात पुनरागमन करणार?? निवड समितीच्या बैठकीत नावावर चर्चा

एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीत रोहित-शिखर धवन ही जोडी दुसऱ्या स्थानी पोहचली आहे.

२०२० वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी वन-डे सामन्यांची मालिका ही भारतीय संघासमोरचं पहिलं मोठं आव्हान असणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. त्यामुळे भारतीय संघ आता कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.