England tour of india 2021 : पुढील महिन्यात पाच फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळानं आपल्या संघाची घोषणा केली आहे. आघाडीचा अष्टपैवू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन झालं आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं गुरुवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली.

इंग्लंड संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर अशून या दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांतून स्टोक्स आणि आर्चरला विश्रांती देण्यात आली होती. भारताविरोधाच चेन्नई येथे होणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय करोनातुन सावरलेला अष्टपैलू मौईन अली याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रीलंका दौऱ्याचा भाग असलेली अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडगोळी जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड संघात कायम आहेत.

असा आहे इंग्लंडचा संघ –
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्रॉवली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच

आणखी वाचा –

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

हार्दिक, इशांतचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड