इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खेळपट्टीला नावं ठेवली. पण इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याने मात्र इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.

Video: “ए बापू, थारी बॉलिंग…”; विराटचं गुजराती ऐकून हार्दिक, अक्षर हसून लोटपोट

इंग्लंडचा संघ पहिली कसोटी सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी त्यांनी संघात चार बदल केले. महत्त्वाची बाब म्हणजे ‘रोटेशन पॉलिसी’च्या (प्रत्येक खेळाडूला विश्रांती मिळावी म्हणून संघात बदल) नावाखाली पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही संघाबाहेर करण्यात आलं. या मुद्द्यावरून इयन बेलने इंग्लंड संघ व्यवस्थापनाचा समाचार घेतला.

Ind vs Eng: अरेरे… इंग्लंडच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

“भारतीय संघ काही महिन्यांनी इंग्लंडमध्ये येणार आहे. त्यांचा संघ मालिकेत १-० किंवा २-०ने आघाडीवर असेल तर ते रोटेशन पॉलिसीचा विचार करतील असं वाटतं का?.. मला वाटत नाही! इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया किंवा भारत दौरा हा कायम खास असतो. त्यांच्या भूमिवर पाहुण्यांनी विजय मिळवणं हे चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतं. भारत इंग्लंडमध्ये १-०ने आघाडीवर असेल तर ते त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजांना नक्की संघाबाहेर बसवणार नाहीत. कारण त्यांना सामना जिंकण्याचं महत्त्व माहिती आहे”, अशा शब्दात बेलने संघ निवडीवर टीका केली.