मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात १६५ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी खेळाडूंना विश्रांनी देऊन नवीन खेळाडूंना संधी देण्याचा भारताचा प्रयोग या सामन्यात फसला. मात्र मधल्या फळीत मनिष पांडेने संयमीपणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत अर्धशतक झळकावलं. ३६ चेंडूत मनिष पांडेने ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५० धावा केल्या.

या खेळीदरम्यान मनिष पांडेने सुरेश रैना आणि धोनीला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना, सर्वात जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मनिष पांडे आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

मनिष पांडेव्यतिरीक्त लोकेश राहुलनेही चौथ्या सामन्यात आश्वासक फलंदाजी केली. इतर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत असताना, राहुलने एक बाजू लावून धरत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. राहुलने ३९ धावा केल्या.

Story img Loader