दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात दयनीय झाली आहे. पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या डावात ३०० पेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर पडलेल्या आफ्रिकेच्या संघाचे फलंदाज दुसऱ्या डावातही झटपट माघारी परतले. चौथ्या दिवशी एडन मार्क्रम, डी-ब्रून हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले.

यानंतर कर्णधार फाफ डु-प्लेसिस मैदानात उतरला. पहिल्या डावात डु-प्लेसिसने अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली होती. मात्र दुसऱ्या डावात डु-प्लेसिसही स्वस्तात माघारी परतला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने डु-प्लेसिसचा भन्नाट झेल घेतला. साहाच्या हाती आलेला चेंडू सुटला मात्र त्यानंतरही साहाने प्रयत्न करत दोन-तीन प्रयत्नांत चेंडू जमिनीवर पडण्याआधी झेल घेत आफ्रिकन कर्णधाराला माघारी धाडलं.

पहिल्या डावात ६४ धावांची खेळी करणारा डु-प्लेसिस दुसऱ्या डावात अवघ्या ५ धावा काढून माघारी परतला.