श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली. पण या खेळीदरम्यान एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला. या घटनेमुळे थोडा वेळ सुन्न झाल्याचे आणि काही स्पष्ट दिसत नसल्याचे पृथ्वीने सामन्यानंतर सांगितले. शॉने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २४ चेंडूत ९ चौकारांसह ४३ धावा केल्या. कर्णधार शिखर धवनसह त्याने भारताला ५८ धावांची तुफानी सुरुवात दिली. पहिल्या पाच षटकांत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून तो किती चांगल्या फॉर्मात आहे, हे दिसून आले.

पृथ्वी शॉला फलंदाजीसाठी सामनावीर ठरवण्यात आले. सामन्यानंतर पृथ्वी म्हणाला, ”मी आता ठीक आहे. हे जरा वेदनादायक आहे, पण ठीक आहे. चेंडू आदळळ्यानंतर मी किंचित सुन्न झालो होतो आणि मला स्पष्ट दिसत नव्हते. या घटनेनंतर मी विचलित झालो. मी खेळपट्टी सोडली पाहिजे होती. आतापासून मी काळजी घेईन.”

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

आजकाल बॅक हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर कंकशन टेस्ट आवश्यक आहे. त्याअंतर्गत फिजिओ खेळाडूची तपासणी करतो आणि जर त्याला काही अडचण असेल, तर तो सामन्यातून माघार घेऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार कंकशन रिप्लेसमेंटची सोय आहे. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉने फिजिओच्या तपासणीदरम्यान स्वत: ला योग्य सिद्ध केले आणि फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाचव्या षटकात दुश्मंता चामिराचा चेंडू पृथ्वीच्या हेल्मेटवर आदळला.

हेही वाचा – IND vs SL: वाढदिवस, वनडे पदार्पण आणि झंझावाती अर्धशतक! इशान किशनने नोंदवला खास विक्रम

पृथ्वी म्हणाला, ”मी आता पूर्णपणे ठीक आहे. जेव्हा मी बाद झालो तेव्हा राहुल द्रविड सर काही बोलले नाहीत. मी कमकुवत चेंडूंवर धावा केल्या. मला स्कोअरबोर्ड धावता ठेवण्याची इच्छा होती. खेळपट्टी खूप चांगली होती. पहिल्या डावात खेळपट्टी चांगली होती, पण दुसऱ्या डावात ती अधिक चांगली झाली. मला वेगवान गोलंदाजांना सामोरे जायला आवडते.”