आज भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिकेचा दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. कृणाल पंड्या पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात आणखी पाच नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला. टीम इंडियामध्ये नेट गोलंदाज म्हणून ज्यांना संघासह नेण्यात आले होते, अशा खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. नियमानुसार सामनेही खेळले जातील आणि मालिका रद्द होणार नाही. आज भारताकडून देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकारिया टी-२० पदार्पण करत आहेत. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघातील आठ नियमित खेळाडूंनी कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना या सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हे पाऊल उचलावे लागले. शिखर धवनच्या करोना चाचणीबद्दल शंका होती पण तो देखील पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

 

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजित सिंग यांना नेट बॉलर म्हणून श्रीलंकेत नेण्यात आले. या सर्वांचा संघातील नियमित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कृणालच्या संपर्कात आलेले खेळाडू पुढील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, मनीष पांडे दीपक चहर, कृष्णाप्पा गौतम, इशान किशन आणि यजुर्वेंद्र चहल यांचा समावेश आहे.

हेही वाचा – भारीच ना..! करोनाचा सामना करण्यासाठी युवराज सिंगनं ‘या’ राज्याला पुरवले १२० बेड्स

भारतीय संघ 

शिखर धवन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतूराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, नवदी सैनी.

श्रीलंकेचा संघ

अविष्का फर्नांडो, बिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डि सिल्वा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका (कर्णधार), रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंता चमीरा.