वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात मुळचा मुंबईकर आणि भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने आपली छाप पाडली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. भारताची सुरुवात डळमळती झालेली असताना शिवमने खेळपट्टीवर तळ ठोकून विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

शिवम दुबेने ३० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. महत्वाची गोष्ट म्हणजे एका क्षणापर्यंत धावगतीमध्ये मागे पडलेल्या भारतीय संघाला शिवमने फटकेबाजी करत पुढे आणलं.

मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. ज्युनिअर वॉल्शच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात शिवमने आपली विकेट फेकली. हेटमायरने त्याचा झेल घेतला. तिसऱ्या विकेटसाठी शिवमने कर्णधार विराट कोहलीसोबत ४१ धावांची भागीदारी केली.

Story img Loader