वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे विंडीजने भारताने विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. भारतीय संघाची या सामन्यातली कामगिरी निराशाजनक राहिली. फलंदाजीत शिवम दुबे आणि ऋषभ पंत यांनी आश्वासक खेळ करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. बऱ्याच कालावधीनंतर ऋषभ पंतने खेळपट्टीवर तग धरत नाबाद ३३ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – ….तर कितीही धावा करा, कमीच पडतील – विराट कोहली

या सामन्यात ऋषभ पंतसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. शेल्डन कोट्रेल विंडीजच्या डावातलं अखेरचं षटक टाकत होता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या ऋषभच्या हातातून बॅट सुटली आणि थेट लेग-अंपायर अनिल चौधरी यांच्या जवळ जाऊन पडली. हा प्रसंग पाहून काहीकाळ समालोचकांमध्येही हशा पिकला होता…..पाहा या घटनेचा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेतला अखेरचा सामना ११ तारखेला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ जिंकून मालिकेत बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video : पोलार्डच्या एकाच षटकात शिवम दुबेची षटकारांची हॅटट्रीक