ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सरवा सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामिवीर पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. सामना सुरु होण्यापूर्वी समालोचन करताना रिकी पाँटींगनं पृथ्वी शॉ कसा बाद होऊ शकतो, याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर काही मिनिटांत लगेच पृथ्वी बाद झाला.

षटक सुरु होण्याआधी समालोचन करताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटींग यानं पृथ्वीची दुखरी नस काय आहे याबाबत वक्तव्य केलं. सुनिल गावसकर यांच्यासोबत समालोचन करताना पाँटींग म्हणाला की, ‘शरीराजवळ न येणारा चेंडू पृथ्वी शॉची कमकुवत बाजू आहे. पॅड आणि बॅटमध्ये खूप अंतर असते, ऑस्ट्रेलियाचं गोलंदाज याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.’

पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं प्रतिनिधीत्व करतो. या संघाचा प्रमुख कोच रिकी पाँटींग आहे. सहाजिकच पाँटींगला पृथ्वीबद्दलच्या सर्व कमकुवत बाजू माहित आहेत. पाँटींग पृथ्वीबद्दलची दुखरी नस सांगितल्यानंतर क्षणार्धात लगेच पृथ्वी शॉ तसाच बाद झाला. पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाला. पृथ्वी शॉ याच्या अपयशी मालिकेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे… पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया…

Story img Loader