टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतात होणारी ही मालिका ३ सामन्यांची असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन संघांमध्ये तब्बल १३ वर्षांनी एकदिवसीय रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनही संघ सज्ज आहेत. आतापर्यंत मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने रंगले आहेत. त्यात दोन सामने पाहुण्यांच्या नावावर आहेत.

विराटच्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार? ‘कॅप्टन कोहली’चं सूचक वक्तव्य

भारत वि. ऑस्ट्रेलिया वन-डेचा वानखेडेवरील इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या आधी १७ ऑक्टोबर २००७ मध्ये एकदिवसीय सामना रंगला होता. या सामन्यात भारताने २ गडी राखून ऑस्ट्रेलिया विरोधात विजय मिळवला होता. त्या आधी दोन वेळा वानखेडेवरील मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

२७ फेब्रुवारी १९९६ – भारत वि. ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
१ नोव्हेंबर २००३ – भारत वि. ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
१७ ऑक्टोबर २००७ – भारत वि. ऑस्ट्रेलिया – भारत २ गडी राखून विजयी

IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…

मालिकेचे वेळापत्रक

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)

T20 World Cup मध्ये होऊ शकतो महत्त्वाचा बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह</p>