भारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबीयांना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी घेऊन जाण्यास ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी पुरूष संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. सुमारे चार महिने दौर्‍यावर भारची संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल. महिला क्रिकेट संघाला एक कसोटी आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळावे लागतील.

पुरुष आणि महिला दोन्ही संघ आपल्या परिवाराला घेऊन चार्टर विमानाने इंग्लंड गाठतील. ३ जून रोजी हे सर्वजण लंडनमध्ये उतरतील. तेथून दोन्ही संघ साऊथम्प्टनला जातील आणि क्वारंटाइन कालावधी पूर्ण करतील. हेक्वारंटाइन कालावधी किती दिवसांचा असेल याबाबतची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा – अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये ‘भूकंप’, कर्णधारालाच हटवलं!

त्यानंतर महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना ब्रिस्टल येथे होईल. साऊथम्प्टनमधील एजेस बाऊल येथे क्वारंटाइन कालावधीनंतर पुरुष संघानेही प्रशिक्षण करणे अपेक्षित आहे. सध्या दोन्ही संघ मुंबईत एकाच हॉटेलमध्ये क्वारंटाइन कालावधीत आहेत. यापैकी एक तुकडी आधी क्वारंटाइन कालावधीत होती, त्यानंतर मुंबईतील खेळाडू बायो बबलमध्ये गेले होते.

हेही वाचा – फ्रेंच ओपन : दंडात्मक कारवाईनंतर नाओमी ओसाकाची स्पर्धेतून माघार

२९ मे रोजी आयसीसीने जाहीर केले, की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात यूके सरकारने मानक करोना प्रोटोकॉलमधून सूट दिली होती, संघांनी सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्यामुळे ही सूट मिळाली आले. ही सूट महत्त्वपूर्ण होती, कारण ब्रिटन सरकारने रेड लिस्टमध्ये असलेल्या सर्व देशांच्या प्रवासावर करण्यास बंदी घातली होती. यात भारताचाही समावेश होता. ज्यांना मंजूरी मिळाली आहे, त्यांना दहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. हा नियम ब्रिटिश नागरिकांनाही लागू आहे.