पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतीय महिला हॉकी संघाशी फोनवरुन संपर्क साधला. ग्रेट ब्रिटनविरोधात कांस्यपदकासाठी झालेला अटीतटीचा सामना एक गोलने गमावल्याने भारतीय महिला संघाचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न लांबवणीवर पडलं. भारतीय महिला कांस्यपदकाचा सामना ४-३ ने पराभूत झाल्यानंतर मोदींनी या खेळाडूंशी संवाद साधला. तेव्हा मोदींनी भावूक झालेल्या आणि पराभावाने निराश होऊन रडणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. यावेळी मोदींनी अनेक खेळाडूंचं नाव घेऊन चौकशी केली. एका खेळाडूला झालेल्या जखमेसंदर्भात मोदींनी आवर्जून चौकशी केली. मात्र जखम झाल्यासंदर्भातील सत्यता आधी त्यांनी पडताळून पाहिली. जेव्हा खरोखरच खेळाडूला जखम झाल्याचं संघाची कर्णधार राणी रामपालने खरोखरच जखम झाल्याचं सांगितलं तेव्हा मोदींनी बापरे म्हणत त्यावर प्रतिक्रिया दिली.

नक्की पाहा हे फोटो >> Olympics: …अन् त्या मैदानातच रडू लागल्या; या फोटोंचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत

राणी रामपालने मोदींशी संघाच्या वतीने संवाद साधला. मोदींनी सुरुवातील महिला संघाचं अभिनंदन केलं. “नमस्ते.. तुम्ही सर्व खूप छान खेळलात. तुम्ही इतका घाम गाळलात. गेल्या पाच वर्षापासून सर्व सोडून तुम्ही हीच साधना करत होतात. तुमची मेहनत पदक आणू शकलं नाही. मात्र तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहे. मी संघाच्या सर्व सहकार्यांना आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देतो. निराश होऊ नका, असं म्हणत मोदींनी महिला खेळाडूंना धीर दिला.

नक्की वाचा >> “आम्ही पदक जिंकलं नाही, पण…”; ऑलिम्पिकमधील पराभवानंतर भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचा भावनिक संदेश

त्यानंतर मोदींनी नवनीतच्या डोळ्याला झालेल्या जखमेबद्दल विचारलं. “काल मी पाहिलं की नवनीतच्या डोळ्याला जखम झालीय,” असं विचारताच राणीने, “होय, तिच्या डोळ्याला काय दुखापत झालीय,”  असं उत्तर दिलं. नवनीतला चार टाक पडल्याचंही राणीने मोदींना सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना मोदींनी, “अरे बापरे!, मी बघत होतो तिला..आता बरी आहे ना..तिच्या डोळ्यांना काही त्रास नाही ना..” असं विचारलं आणि फोन कनेक्शनमध्ये काहीतरी अडचण आली. त्यानंतर मोदींनी, “वंदना वगैरे सर्वजण चांगले खेळले. सलीमा पण चांगली खेळली,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> Olympics 2020: पराभूत झालेल्या भारतीय महिला संघासाठी ‘चक दे..’च्या कबीर सरांचा खास संदेश; म्हणाले, “आम्ही…”

नक्की पाहा >> ‘कबीर खान’शी होतेय भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची तुलना… पण त्यांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

मोदींशी बोलताना अनेक महिला खेळाडूंना भावना अनावर झाल्या आणि त्या रडताना दिसल्या. त्यावरुन मोदींनी सर्व महिला खेळाडूंना, “तुम्ही रडणं बंद करा. मला तुमच्या रडण्याचा आवाज येत आहे. देश तुमच्यावर गर्व करतोय. निराश होऊ नका. किती दशकानंतर हॉकीचा खेळ जो की भारताची ओळख आहे तो पुन्हा पुनर्जिवीत होत आहे. हे तुमच्या मेहनतीमुळे झालं आहे,” असं सांगितलं.