पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात गेल्या काही वर्षभरात सुरु असलेलं शाब्दीक द्वंद्व आपण अनुभवतो आहोत. स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवणाऱ्या नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी, चौकीदार चोर है!! म्हणत चांगलच आव्हान दिलं. दोन्ही नेत्यांमधल्या या शाब्दीक युद्धाचे पडसाद, आयपीएलमधील बाराव्या हंगामातील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातही पहायला मिळाले. सवाई मानसिंह मैदानावर झालेल्या या सामन्यात, चौकीदार चोर है ! च्या घोषणा देण्यात आल्या. सोशल मीडियावर या घोषणाबाजीचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. बीबीसी या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.
Crowd at IPL match yesterday saying “Chowkidar Chor Hai” pic.twitter.com/er8pgOQJgC
— Zainab Sikander (@zainabsikander) March 26, 2019
पंजाबच्या ख्रिस गेलने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली. पंजाब फलंदाजी करत असताना १४व्या षटकात पहिल्यांदा स्टेडियममध्ये स्पीकरवरून ‘जीतेगा भई जीतेगा!’, अशी घोषणा देण्यात करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनी त्याला ‘राजस्थान जीतेगा’, असा प्रतिसाद दिला. सामन्याच्या १८व्या षटकातील पहिला चेंडू जयदेव उनाडकटने टाकला तेव्हा नॉर्थ स्टँडमधून मोदी-मोदी, अशा घोषणा सुरु झाल्या. या षटकामध्ये निकोलस पूरनने जेव्हा चौकार लगावला तेव्हा चौकीदार चोर है’, ही घोषणा देण्यात आली. त्यावेळी चौकीदार चोर है’, ही घोषणा तब्बल पाच वेळा देण्यात आली. हॉट-स्टारच्या अधिकृत वेबसाइटवर या घोषणा ऐकायला मिळू शकतात. तुम्ही जर बेवसाईटवर गेलात, तर या सामन्याच्या २ तास ३० मिनिटांनी तुम्ही या घोषणा ऐकू शकता. हा सामना पाहणाऱ्या २३ वर्षीय जयंत चौबे याने देखील यावृत्ताला दुजोरा दिला आहे.
उनाडकटने १८व्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला. पंचांनी तो वाईड असल्याचे सांगितले. त्यानंतर उनाडकट पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी माघारी परतत असताना स्टेडियममध्ये ‘ चौकीदार चोर हैं’चा नारा सुरु झाला. त्यानंतर उनाडकट तिसरा चेंडू टाकेपर्यंत स्टेडियमधील चाहत्यांनी तब्बल पाच वेळा ‘चौकीदार चोर हैं’चा नारा दिला.
अवश्य वाचा – IPL 2019 : आश्विनच्या ‘त्या’ रनआऊटबद्दल राहुल द्रविड म्हणाला…