आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगूल आता वाजलेलं आहे. १९ डिसेंबर रोजी कोलकाता शहरात आगामी हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. यासाठी कोलकाता शहरानेही आपल्या संघातील काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा यासारख्या प्रमुख खेळाडूंना आगामी हंगामासाठी लिलावाच्या प्रक्रियेत उतरावं लागणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईने गमावलं, कोलकात्याने कमावलं! मराठमोळ्या सिद्धेश लाडने मुंबईची साथ सोडली

कोलकाता संघाने करारमुक्त केलेले खेळाडू पुढीलप्रमाणमे –

अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस लिन, जो डेन्ली, के.सी. करिअप्पा, मॅट केली, निखील नाईक, पियुष चावला, पृथ्वीराज यारा, रॉबिन उथप्पा, श्रीकांत मुंढे

अवश्य वाचा – IPL 2020 : ८ कोटी ४० लाखांची रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानकडून डच्चू

Story img Loader