IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणारा श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा यंदा पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहता येणार आहे. गेल्या वर्षी अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबईने मलिंगावर बोली लावली नव्हती, मात्र संघ व्यवस्थापनाने लसिथ मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. या वेळी मात्र मलिंगाला मुंबईने २ कोटीच्या मूळ किमतीला विकत घेतले.
#IPLAuction: लसिथ मलिंगाचं मुंबईच्या संघात पुनरागमनhttps://t.co/NlbsNLQata < अपडेट्स
२ कोटींची बोली लावत मलिंगा मुंबई इंडियन्स @mipaltan संघाकडे#LasithMalinga #IPL2019Auction #IPLAuction2019 #IPL2019 pic.twitter.com/nkoekXnQXf— LoksattaLive (@LoksattaLive) December 18, 2018
गेल्या वर्षी मलिंगा संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता. त्याचा इतर तरुण गोलंदाजांना फायदा झाला. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड, फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंह आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांच्यासह मलिंगाही मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या टिप्स देताना दिसला. दहाव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने पुण्यावर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदा नवीन हंगामात नवीन खेळाडू आणि प्रशिक्षकांसह मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.