रणजी करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईकर शिवम दुबेला बंगळुरूच्या (RCB) संघात स्थान मिळाले आहे. त्याला ५ कोटीची बोली लावून विकत घेण्यात आले. सुरुवातीला मुंबईने बोली लावली. पण त्यानंतर रंगलेल्या बोलीच्या शर्यतीत बंगळुरूने बाजी मारली.

 

घरच्या मैदानावर खेळताना मुंबईने रणजी करंडक सामन्यात गुजरातविरुद्ध पहिल्या डावात २९७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या डावात मुंबईकडून मधल्या फळीत सिद्धेश लाडचं अर्धशतक आणि तळातल्या फळीमध्ये शिवम दुबेने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने आपला डाव सावरला होता. पहिल्या दिवसाच्या खेळात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अखिल हेरवाडकर आणि जय बिस्ता स्वस्तात माघारी परतले. यानंतर सिद्धेश लाडने सूर्यकुमार यादवसोबत मुंबईच्या डावाला आकार दिला. मात्र सूर्यकुमार यादव माघारी परतल्यानंतर अरमान जाफर आणि आदित्य तरे भोपळाही न फोडता माघारी परतल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी शिवमने ११० धावांची खेळी केली होती.

याशिवाय, शिवम दुबेने अनेक वेळा मुंबईच्या संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. आता IPL मध्ये तो कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader