IPL 2020 च्या हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर ३३२ खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रीयेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या लिलाव प्रक्रीयेबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी –

तारीख – १९ डिसेंबर (गुरूवार)
वेळ – दुपारी २.३० वा.
ठिकाण – कोलकाता
टिव्हीवर कुठे – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
कधी – दुपारी २.३० वा. – स्टार स्पोर्ट्स १ हिंदी / १ HD हिंदी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, १ तमिळ, १ तेलुगू, १ कन्नड, १ बांगला; दुपारी ३.२० वा. – सिलेक्ट १/ १ HD (लाईव्ह प्रक्षेपण)

IPL 2020 Auction : स्टेन, मॅक्सवेल, उथप्पासह ३३२ खेळाडूंवर लागणार बोली

पहा Photo : IPL 2020 : हे आहेत चेन्नईचे ‘सुपर किंग्ज’

याशिवाय हॉटस्टारवर देखील याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

लिलाव प्रक्रियेबाबत अधिक माहिती

सुरूवातीला एकूण ९७१ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. त्या यादीत ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू होते. त्यानंतर आता ३३२ खेळाडूंची नावे अंतिम करण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले १९ खेळाडू आहेत. याशिवाय मूळ यादीत नसलेला विंडीजचा केसरिक विल्यम्स, बांगलादेशचा मुश्फिकूर रहीम, ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पा, इंग्लंडचा २१ वर्षीय विल जॅक्स यांसारख्या २४ नवोदित खेळाडूंची नावेदेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या ३३२ खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्स पाहणार आहेत.

IPL 2020 : अशी आहे मुंबई इंडियन्सची ‘पलटण’

IPL 2020 ची लिलाव प्रक्रीया हा केवळ एक दिवस असणार आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ संघांना आपला चमू पूर्ण करण्यासाठी एकूण ७३ खेळाडू हवे आहेत. त्यापैकी २९ खेळाडू हे परदेशी असणार आहेत. अंतिम यादीत भारताचा रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट यांसारख्या खेळाडूंना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. मानसिक ताणामुळे तो क्रिकेटपासून काही काळ दूर होता. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, मिचेल मार्श, आफ्रिकेचे डेल स्टेन, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांनादेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

Story img Loader