बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शहा यांच्या खांद्यावर आता आणखी एक नवीन जबाबदारी आलेली आहे. आयसीसीच्या यापुढील बैठकींमध्ये जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

अवश्य वाचा – BCCI मध्ये दादाचा कार्यकाळ वाढणार?? लोढा समितीच्या शिफारसीत बदल करण्यावर एकमत

२३ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळली. याचवेळी जय शहा यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली. रविवारी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुलीने, आयसीसी बैठकीत जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करेल असं स्पष्ट केलं.

सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयची सुत्र येण्याआधी, सर्वोच्च न्यायालयाची क्रिकेट प्रशासकीय समिती बीसीसीआयचा कारभार सांभाळत होती. त्यामुळे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आयसीसी बैठकीत बीसीसीआयची बाजू मांडत होते. मात्र संघटनेच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर आता ही जबाबदारी जय शहांकडे आली आहे.