राष्ट्रीय संघटनेचे निरीक्षक अनुपस्थित

मुंबई : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेवर बरखास्तीची टांगती तलवार असतानाच राष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने मंगळवारी झालेल्या निवडणुकीसाठी निरीक्षकच न पाठवल्यामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निवडणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवल्यामुळे राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

chiplun Sangameshwar assembly constituency We will get to see fight like NCP vs NCP
चिपळूण-संगमेश्वर मधील राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढतीत मुस्लीम मते निर्णायक ठरणार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष
Raj Thackeray MNS Third List
MNS List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, आणखी १३ जणांना तिकिट
Jyoti Mete
Jyoti Mete : ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; विधानसभा लढवणार?
Raj Thackeray
Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”
Provocative slogans, Rashtriya Swayamsevak Sangh parade, RSS parade, Ratnagiri, RSS parade Ratnagiri,
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार प्रत्येक राज्य संघटनेला नोंदणी असल्याची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र राज्य बास्केटबॉल संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे संगणकीय नोंदणीच नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याने कागदपत्रे सादर करण्यात विलंब होत होता. त्यातच संघटनेने मंगळवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावून निवडणूक उरकली. राज्य संघटनेला संलग्न असलेल्या अनेक जिल्हा संघटनांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून निवडणूक पार पाडण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष खा. पूनम महाजन यांच्या सही-शिक्क्यानिशी काही व्यक्तींना स्नेहसंमेलनाचे निमंत्रण पाठवून बोलावण्यात आले. त्यापैकी एकाला जळगाव जिल्ह्य़ाचा प्रतिनिधी म्हणून बैठकीस बसवले. रायगड जिल्हा संघटनेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे असतानाही त्यांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवले नाही. मात्र त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला बसवण्यात आले. महासचिव गोविंद मुथूकुमार यांच्या भावाला हिंगोलीचा प्रतिनिधी म्हणून बैठकीला बसविण्यात आले. चार उपाध्यक्ष निवडण्याचे जाहीर केल्यानंतरही पाच उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

महाजन यांची दुसऱ्यांदा संघटनेच्या अध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष म्हणून जयदेव श्रॉफ यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी मुथूकुमार निवडून आले असून खजिनदारपदी इब्राहिम लकडावाला यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सतेज पाटील, निखिल लातूरकर, मधुकेश्वर देसाई, एमओ वर्घिस आणि एम. वेंकटेश यांची निवड केली आहे. मात्र या निवडणुकीसाठी राष्ट्रीय महासंघाने निरीक्षक पाठवला नसल्यामुळे या कार्यकारिणीचे व नोंदणी असल्याची अधिकृत कागदपत्रे नसलेल्या महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे पुढे काय होईल, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.