३१ डिसेंबरपासून हैदराबादमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघाची निवड करण्यात आलेली आहे. २१ संभाव्य खेळाडूंच्या यादीतून १५ जणांच्या अंतिम संघाची निवड करण्यात आलेली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा होणं अजून बाकी असलं तरीही राज्य कबड्डी असोसिएशनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संघात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणाऱ्या रिशांक देवाडीगाकडे यंदा महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. एकूण ३१ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून ६ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे, स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर या स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीपासूनचे सामने दाखवण्यात येणार आहेत
.
असा असेल महाराष्ट्राचा संघ –

रिशांक देवाडीगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे (सांगली), गिरीश एर्नाक (ठाणे), विराज लांडगे (पुणे), नितीन मदने (सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे (ठाणे), ऋतुराज कोरवी (कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई (पुणे), अजिंक्य कोपरे (मुंबई शहर), रवी ढगे (जालना)

राखीव खेळाडू – अक्षय जाधव (पुणे), उमेश म्हात्रे (ठाणे), महेंद्र राजपूत (धुळे)

Story img Loader