भारताचा माजी कर्णधार आणि महान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड आणि कामगिरी आहे. धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने तिन्ही आयसीसी ट्रॉफी (टी-२० वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकपआणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या आहेत. धोनीने लोकांच्या मनावर राज्य केले. त्याने गेल्या वर्षी याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले, पण त्याच्याबद्दल लोकांमध्ये असलेली ‘क्रेझ’ अजूनही तशीच आहे. अलीकडेच, अजय गिल नावाच्या एका चाहत्याने धोनीला भेटण्याच्या निमित्ताने असे काही केले, जे जाणून कोणीही थक्क होईल.

हरयाणाचा १८ वर्षीय अजय गिल धोनीचा जबरदस्त चाहता आहे. धोनीला भेटण्यासाठी त्याने हरयाणातील त्याच्या गावातून रांचीला पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्याने २९ जुलै रोजी आपला प्रवास सुरू केला. १६ दिवसात सुमारे १४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तो रांचीला पोहोचला. मात्र, तो धोनीला भेटू शकला नाही, कारण धोनी आयपीएलसाठी चेन्नईत होता. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीसाठी (यूएई) रवाना झाला. लीगचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जातील.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

हेही वाचा – Ind vs Eng : ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाच्या बाल्कनीत डुलक्या घेत होते रवी शास्त्री, पाहा फोटो

धोनीच्या निवृत्तीनंतर अजयनेही…

टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, अजय म्हणाला, ”मी धोनीला भेटल्यानंतर घरी परतेन. धोनीने भेटायला किमान १० मिनिटे दिली पाहिजेत, कारण मी लांबून पायी आलो आहे.” जेव्हा अजयला सांगितले गेले, की धोनी तीन महिन्यांनी रांचीला येईल, तेव्हा त्याने तिथे थांबण्याचा आग्रह धरला. पण नंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे मन वळवल्यानंतर अजय तात्काळ परत येण्यास तयार झाला. अजय त्याच्या गावात एका सलूनमध्ये काम करतो. त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते, पण धोनीच्या निवृत्तीनंतर त्याने खेळणे बंद केले.

धोनीची कामगिरी

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जला तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्याने चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.