न्यूझीलंडची ऑलिम्पिक सायकपटू ऑलिव्हिया पोडमोअरचा मृत्यू झाला आहे. ऑलिव्हिया अवघ्या २४ वर्षांची होती. यासंदर्भातील माहिती न्यूझीलंडच्या ऑलिम्पिक समितीने दिल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकबरोबरच ऑलिव्हियाने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं. मात्र नुकत्याच टोक्योमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तिची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये संघाचा भाग नव्हती. तिच्या आकस्मिक मृत्यूने न्यूझीलंडमधील क्रीडा जगत हळहळलं आहे.

पोलीस काय म्हणाले?

न्यूझीलंड पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैकाटो येथील राहत्या घरी ऑलिव्हियाचा मृतदेह आढळून आला. न्यूझीलंडच्या उत्तरेकडील एका बेटावर ऑलिव्हियाचे घर असून तिथेच सोमवारी तिचा मृतदेह आढळून आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

भावाने वाहिली श्रद्धांजली…

ऑलिव्हियाचा भाऊ मिशेल याने फेसबुकवर एक पोस्ट करत आपल्या बहिणीला श्रद्धांजली अर्पण केलीय. “माझ्या प्रिय बहिणीला आणि फिल मॉमोअर यांच्या मुलीला श्रद्धांजली अर्पण करतो. तू कायमच आमच्या हृदयामध्ये राहशील,” असं तिच्या भावाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सायकलींग संघाची काळजी…

न्यूझीलंडच्या ऑलिम्पिक समितीने दिलेल्या माहितीनुसार टोक्योमध्ये सायकलींगच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूझीलंडच्या संघाला ऑलिव्हियाच्या मृत्यूची माहिती मिळालीय. “आम्ही तिच्या संघ सहकाऱ्यांना पूर्ण मानसिक आधार आणि हवी ती मदत करण्याची तयारी केली आहे. खेळाडूंनी देशात पतरण्याची आम्ही वाट पाहत आहोत,” असं समितीने म्हटलं आहे. यंदा न्यूझीलंडच्या सायकलींगच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदकं जिंकली आहेत.

नक्की पाहा >> Viral Video : नीरज चोप्रा नाही तर ‘या व्यक्तीने मिळवून दिलंय भालाफेकमध्ये पहिलं मेडल’

शेवटची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत…

ऑलिव्हियाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्यामागे इतर काही कारणं आहेत यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. मात्र अशी शंका उपस्थित करण्यामागील सर्वात मोठं कारण आहे तिच्या मृत्यूच्या काही तास आधीच तिने इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट. या पोस्टमध्ये ऑलिव्हियाने समाजाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी जमल्या नाहीत तर त्याबद्दल बोलणं कठीण असतं असं म्हटलं आहे. “खेळ हा प्रकार आफल्यापैकी अनेकांनी मनोरंजन असला तरी तो एक संघर्ष आहे. ही लढाई असली तरी यात इर्षा आहे. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला जे वाटतं ते सामान्य आहे. पण जेव्हा तुम्ही पराभूत होता, जेव्हा तुम्ही पात्र ठरता तरी तुमची निवड केली जात नाही, जेव्हा तुम्ही जखमी होता, जेव्हा तुम्ही स्वत:चं घर घेण्यासाठी समाजाची इच्छा पूर्ण करु शकत नाही, लग्न, मुलं यासारख्या गोष्टींऐवजी तुम्ही तुमच्या आवडत्या खेळासाठी सर्वकाही देता तेव्हा जे वाटतं ते सांगता येणार नाही,” असं ती इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटली होती.