पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. पाकिस्तानच्या नागरिकांना जेव्हा करोनाचा फटका बसला, त्यावेळी आफ्रिदीने नागरिकांना मदत केली होती. त्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यांच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावाला पाठींबा देत त्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली. आपल्या आत्मचरित्रात गौतम गंभीरवर टीका केल्यामुळेही तो चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आफ्रिदी चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रविण कुमारने शेअर केला जुना फोटो, रोहित शर्मा म्हणतो…

आफ्रिदीने नुकतेच त्याच्या आवडीच्या सर्वोत्तम ११ विश्वचषक खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे त्यात भारताच्या एकाच खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, महेंद्रसिंग धोनी इतकेच नव्हे तर पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या इम्रान खानचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. आफ्रिदीने सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा सइद अन्वर आणि अडम गिलक्रिस्ट यांना संघात स्थान दिले आहे.

“IPL वर अनेकांचे EMI अन् संसार अवलंबून आहेत, त्याचं काय?”

मधल्या फळीत त्याने ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रिकी पॉन्टींगला स्थान दिले आहे. त्याच्यासह भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा इंजमाम उल हक यांनाही संघात आफ्रिदीने समाविष्ट केले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने आफ्रिकेचा जॅक कॅलीस याला स्थान दिले आहे. गोलंदाजांमध्ये त्याने पाकिस्तानचे वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि सकलेन मुश्ताक तर ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न यांना पसंती दिली आहे.

क्रीडाक्षेत्रात खळबळ! दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूला Coronavirus ची लागण

आफ्रिदीने निवडलेला सर्वकालीन विश्वचषक संघ – सइद अन्वर (पाकिस्तान), अडम गिलक्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकी पॉन्टींग (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), इंजमाम उल हक (पाकिस्तान), जॅक कॅलीस (आफ्रिका), वसीम अक्रम (पाकिस्तान), शोएब अख्तर (पाकिस्तान), सकलेन मुश्ताक (पाकिस्तान), ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया).