प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने अनोखा इतिहास रचला आहे. २० सप्टेंबर रोजी तेलगू टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पाटण्याने बरोबरी राखण्यात यश मिळवलं. प्रदीप नरवालने या सामन्यात चढाईमध्ये १७ गुणांची कमाई केली. यासोबत प्रदीपने सातव्या हंगामात २०० गुणांचा टप्पा पार केला. प्रो-कबड्डीच्या सलग तीन हंगामांमध्ये २०० गुणांचा टप्पा ओलांडणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला आहे.

गेल्या ३ हंगामांमध्ये प्रदीप नरवालचे चढाईतले गुण –

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
Tanush Kotian made his IPL 2024 debut
PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

हंगाम पाचवा – ३६९ गुण

हंगाम सहावा – २३३ गुण

हंगाम सातवा – २०७ गुण*

प्रो-कबड्डीचं सलग तीनवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाटणा पायरेट्सची यंदाच्या हंगामात फारशी आश्वासक कामगिरी झालेली नाहीये. सध्याच्या घडीला पाटण्याचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.