भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने षटकार लगावत कसोटीमधील पहिले शतक झळकवाले. पंतने ११८ चेंडूचा सामना करताना १०१ धावांची नाबाद खेळी केली आहे. पंतने आपल्या शतकी खेळी दरम्यान तीन षटकार आणि १४ खणखणीत चौकार लगावले. पंतने राहुलच्या साथीने आतापर्यंत नाबाद १७७ धावांची भागिदारी केली आहे. या शतकी खेळीसह पंत इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पहिला यष्टरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी धोनीला आपल्या करीयरमध्ये अशी कामगिरी करता आली नाही. पण पंतने इंग्लंडच्या मैदानावर शतक झळकावत आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये चौथ्या डावांत फलंदाजी करताना शतक झळकावणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज म्हणूनही पंतच्या नावावर विक्रम झाला आहे.
अदिल रशिदच्या चेंडूवर षटकार लगावत ऋषभ पंतने कसोटीमधील पहिले शतक झळकावले. पंतने ११८ चेंडूचा सामना करताना दमदार शतकी खेळी केली. ऋषभ पंतने शतक झळकावल्यानंतर त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. विरेंद्र सेहवाग, कैप, लक्ष्मणसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूने त्याचे कौतुक केले आहे.
First Indian wicket keeper to score a 100 in England and the first Indian keeper to score a 100 in the fourth innings. Delightful innings from Rishabh Pant. pic.twitter.com/q7TfdB7qDk
— Mohammad Kaif (@MohammadKaif) September 11, 2018
Opened account in Test Cricket with a 6, first century in Test Cricket with a 6. Very impressive young man- Rishabh Pant. A brilliant innings from KL Rahul as well. Shining light amidst a difficult tour.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 11, 2018
oversea century Dhoni=0
Rishabh pant =1
Take that dhoni fans who abuses this young player #ENGvIND #RishabhPant pic.twitter.com/0k318qrgme— Cules ™ (@BiswalPreetam) September 11, 2018
Congratulations to @RishabPant777 for his maiden Test century, bringing it up in style with a six!