आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रविंद्र जाडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं आपलं पहिलं स्थान गमावलं आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन  सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेत रविंद्र जाडेजाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत फायदा मिळालेला होता. मात्र तिसऱ्या कसोटीत जाडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, याचा फायदा घेत शाकिबने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मात्र कसोटी गोलंदाजांच्या यादीत जाडेजाने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

याव्यतिरीक्त इंग्लंडचा खेळाडू अॅलिस्टर कूकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या द्विशतकाचा फायदा झालेला आहे. फलंदाजांच्या यादीत अॅलिस्टर कूकने सहाव्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. फलंदाजांच्या यादीत भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे. चेतेश्वर पुजाराने आपला चौथा क्रमांक कायम राखलेला आहे. यानंतर कर्णधार विराट कोहली ८०६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर, लोकेश राहुल ७६१ गुणांसह नवव्या क्रमांकावर तर अजिंक्य रहाणे ७६० गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसीची फलंदाजांसाठीची क्रमवारी –
१) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया
२) जो रुट – इंग्लंड
३) केन विल्यमसन – न्यूझीलंड
४) चेतेश्वर पुजारा – भारत
५) विराट कोहली – भारत
६) अॅलिस्टर कुक – इंग्लंड
७) अझर अली – पाकिस्तान
८) हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका
९) लोकेश राहुल – भारत
१०) अजिंक्य रहाणे – भारत

आयसीसी गोलंदाजांसाठीची क्रमवारी –
१) रविंद्र जाडेजा – भारत
२) जेम्स अँडरसन – इंग्लंड
३) रविचंद्रन आश्विन – भारत
४) जोश हेजलवुड – ऑस्ट्रेलिया
५) रंगना हेरथ – श्रीलंका
६) कगिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका
७) स्टुअर्ट ब्रॉड – इंग्लंड
८) डेल स्टेन – दक्षिण आफ्रिका
९) वर्नेन फिलँडर – दक्षिण आफ्रिका
१०) नील वेंगर – न्यूझीलंड

आयसीसीची अष्टपैलू खेळाडूंसाठीची क्रमवारी –
१) शाकिब अल हसन – बांगलादेश
२) रविंद्र जाडेजा – भारत
३) रविचंद्रन अश्विन – भारत
४) मोईन अली – इंग्लंड
५) बेन स्टोक्स – इंग्लंड