आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हटले, की आपल्यासमोर त्यांचे वागणे, त्यांचा पैसा-प्रसिद्धी लक्षात येते. काही क्रिकेटपटू हे कितीही मोठे झाले, तरी सभ्यता आणि साधेपणा अंगीकारून जीवन जगतात. पण, सध्याच्या युवा क्रिकेटपटूंबाबत असे सांगणे कठीण आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत ०-३ असा पराभव पत्करला. या पराभवानंतर लंकेच्या स्टार क्रिकेटपटूंनी मोठी चूक करत सोशल मीडियावर आपले नाव खराब केले आहे.

श्रीलंकेचे दोन क्रिकेटपटू निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस यांनी बायो-बबलचे उल्लंघन केले. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांचे कृत्य स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कुसल मेंडिसच्या हातात मादक पदार्थ दिसत आहे. मेंडिस हा पदार्थ निरोशन डिकवेलाबरोबर सेवन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

 

 

 

हेही  वाचा – नेमबाजी वर्ल्डकप : महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’ राही सरनोबतने रचला इतिहास!

हा व्हिडिओ व्हायरल होताच लंकेच्या चाहत्यांचा रोष सोशल मीडियावर समोर आला. ‘हे दोन खेळाडू स्वत: ला लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का?, कदाचित धूम्रपान करत असतील, हा पदार्थ गांजा देखील असू शकतो, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस आणि दानुष्का गुणथिलाका यांच्याविरूद्ध चौकशी सुरू केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

 

श्रीलंकेचा सलग पाचवा मालिका पराभव

ऑक्टोबर २०२० नंतर श्रीलंकेला सलग पाचव्या टी-२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. काळाच्या ओघात लंकेचा क्रिकेटमधील दर्जा घसरत चालला आहे. श्रीलंका आता इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना २९ जून रोजी चेस्टर ली स्ट्रीट येथे खेळला जाईल.