भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. फलंदाजीचा हा ‘उस्ताद’ क्रिकेट विश्वाचा निर्भय ब्रँड अँम्बेसेडर मानला जातो. रन-मशीनशिवाय कोहलीला आक्रमक कर्णधार म्हटले जाते. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. कोहली हा भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार मानला जातो. मात्र सुरुवातीच्या काळात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा विचार याउलट होता.

शोएब अख्तर स्पोर्टस्किडाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ”विराट भारतीय कर्णधार होईल, अशी मला खात्री नव्हती. तो कर्णधार होऊन चूक करत आहे. कर्णधारपदाचा दबाव त्याच्यावर परिणाम करेल, कारण तो खूपच तरुण आहे. कारण त्याला आधी धावा बनवण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्याला त्याचा खेळ खेळू द्यावा, असे मी अनुष्काला सावध करत एका कार्यक्रमात सांगितले होते.”

विराटने वर्षानुवर्षे केलेली चांगली कामगिरी पाहून शोएब अख्तर सुखावला आहे. तो विराटबाबतीत चुकीचा सिद्ध झाला याबद्दल आनंदी आहे. त्याने विराटच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ”विराटने वेगवान गोलंदाजीच्या संघात आक्रमक दृष्टिकोन बाळगण्यात मदत केली. त्यामुळे हे गोलंदाज क्रिकेटविश्वात राज्य करत आहेत”, असे अख्तरने म्हटले.

हेही वाचा – SL vs IND : हार्दिक पंड्यासह ९ भारतीय क्रिकेटपटू टी-२० मालिकेबाहेर!

”टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पाकिस्तान भारताला हरवणार”

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ ही यंदाची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असणार आहे. यूएईमध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम झाल्यानंतर लवकरच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील १२ संघांना मुख्य अनिर्णित दोन गटात विभागले जाईल. पात्रता फेरीनंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. यूएईमध्ये होणाऱ्या या मोठ्या कार्यक्रमापूर्वी अनेक तज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी आपले मत आणि भविष्यवाणी करण्यास सुरवात केली आहे. शोएब अख्तरनेही याबाबत एक भविष्यवाणी व्यक्त केली होती. टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी ही पहिल्या मोसमाप्रमाणे होईल, असा अख्तरचा विश्वास आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानशी टक्कर घेईल. मात्र, यावेळी पाकिस्तानी संघ भारताला मागे टाकेल, असा दावाही अख्तरने केला होता.