आतापर्यंत क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनेकदा व्यत्यय आलेला आपण पाहिला असेल. कधी पावसामुळे तर कधी अंधुक प्रकाशामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळ थांबवण्यात आला आहे. मात्र सोमवारपासून सुरु झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यात एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील रणजी करंडक सामन्यात चक्क साप मैदानात शिरल्यामुळे सामना थांबवलाला लागला.
BCCI ने आपल्या ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
SNAKE STOPS PLAY! There was a visitor on the field to delay the start of the match.
Follow it live – https://t.co/MrXmWO1GFo#APvVID @paytm #RanjiTrophy pic.twitter.com/1GptRSyUHq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2019
विदर्भाने गेल्या दोन हंगामात रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावलं आहे. या हंगामाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या विदर्भाचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या हंगामात विदर्भाचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.