करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे सध्या क्रीडा क्षेत्रातील बहुतांश जण सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. या माध्यमातून ते चाहत्यांशी तसेच आपल्या संघातील सहकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.

तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडलो – विराट कोहली

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या दोघांनी इस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी युवराज आणि कैफ दोघांनी आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत चर्चा केली. तसेच क्रिकेटच्या मैदानावरील काही आठवणींनाही उजाळा दिला. या चॅटदरम्यान नॅटवेस्ट फायनल, कैफ-युवराजची विजयी खेळी आणि गांगुलीचा टी-शर्ट फिरवून केलेला जल्लोष याबाबतही चर्चा झाली. त्यावेळी गांगुलीबद्दलची एक गोष्ट कैफने स्पष्ट केले.

“… तोपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट नाहीच”

असा रंगला कैफ-युवराज संवाद :

कैफ – दादा (गांगुली) सारखं मला ओरडून सांगत होता की एकेरी धाव घे आणि युवराजला स्ट्राइक दे

युवराज – दादाने तुला सांगितलं होतं ना की युवराजला स्ट्राइक दे. तो ओरडत राहिला की एकेरी धाव घे. एकेरी धाव घे आणि तू पुढच्या चेंडूवर काय केलंस आठवतंय ना?

कैफ – मला पुढचाच चेंडू आखूड टप्प्याचा मिळाला होता. त्या काळी मला आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल शॉट मारायची आवड होती. मी तो मोह आवरूच शकलो नाही. मी पुल शॉट मारला आणि तो चेंडू मस्तपैकी षटकार गेला.

युवराज – आणि तेवढंच नाही.. षटकार मारल्यावर तू माझ्याकडे आलास आणि मला ग्लोव्ह्जवर पंच मारून म्हणालास की आम्ही पण तर मैदानावर खेळायला आलोय (दोघे हसले). त्यानंतर दादाला समजलं की कैफपण षटकार मारू शकतो.

कैफ – हो.. मला हे पण आठवतंय की मला एकेरी धाव घेण्याचा संदेश देण्यासाठी गांगुली मैदानात कोणाला तरी पाणी घेऊन पाठवणार होता, पण मी जेव्हा षटकार मारला त्यानंतर कोणीही मैदानात आलं नाही. उलट सगळ्यांनी जागेवर बसा असं दादानी सांगितलं….