आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालला मोठा दंड ठोठावला आहे. ढाका येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात सामनाधिकारी यांच्याविरूद्ध अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल तमिमला हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम दंड स्वरुपात वसूल केली जाईल.

तिसऱ्या एकविदसीय सामन्यात श्रीलंकेकडून बांगलादेशला ९७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण यजमान बांगलादेशने ही मालिका २-१ अशी जिंकली. आयसीसीने म्हटले, की आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.३मध्ये तमिमला दोषी ठरवले होते. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषेचा वापर करण्याहबाबत हे कलम आहे.”

हेही वाचा – ‘‘वामिका नावाचा अर्थ काय आणि ती कशी आहे? आम्ही तिची झलक पाहू शकतो का?”

 

तमिमच्या रेकॉर्डमध्ये आयसीसीने एक नीचांक गुण जोडला आहे. जेव्हा एखादा खेळाडू २४ महिन्यांत चार किंवा त्याहून अधिक नीचांक गुण प्राप्त करतो, तेव्हा त्याला निलंबनास सामोरे जावे लागते. शुक्रवारी झालेल्या सामन्यात आपली विकेट गमावल्यानंतर तमिमने चुकीच्या भाषेचा वापर केला.

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सनं IPLचं केलं ‘भन्नाट’ पद्धतीनं स्वागत, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

तमिमने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे आणि त्यामुळे आता त्याच्याविरूद्ध कोणत्याही औपचारिक कारवाईची गरज नाही, असे आयसीसीने म्हटले आहे. तमिमवर ऑन फील्ड पंच शराफुद्दौला इब्ने शाहिद आणि तनवीर अहमद, टीव्ही पंच गाझी सोहेल आणि चौथे अधिकारी मसूदूर रहमान यांनी आरोप ठेवले होते.