करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. सध्याची खडतर परिस्थिती पाहता, हे लॉकडाउन आणखी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. या काळात अस्सल क्रीडा प्रेमींना कोणत्याही खेळाची मजा घेता येत नाहीये. Sony Pictures Sports Network ने अशाच क्रीडा प्रेमींसाठी एक नजराणा आणला आहे. भारताकडून ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या खेळाडूंचा प्रवास Sony Network च्या Digital Platfrom वर दाखवला जाणार आहे. १ मे पासून मेडल ऑफ ग्लोरी ही १५ भागांची मालिका खास क्रीडा प्रेमींसाठी दाखवली जाणार आहे.
लिएँडर पेस, अभिन बिंद्रा, साक्षी मलिका, योगेश्वर दत्त, सुशील कुमार यासारख्या खेळाडूंचा जीवनप्रवास या भागांमधून उलगडवून दाखवला जाणार आहे. याचसोबत लॉकडाउन काळात हे खेळाडू सध्या काय करत आहेत याची माहितीही चाहत्यांना मिळणार आहे. या भागांमध्ये चाहत्यांसाठीही खास सरप्राईज असणार आहे.
कोणत्या खेळाडूंचा होणार समावेश??
१) प्रस्तावना आणि माहिती – १ मे
२) अभिनव बिंद्रा – ४ मे
३) लिएँडर पेस – ६ मे
४) सुशील कुमार – ८ मे
५) साक्षी मलिक – ११ मे
६) कन्नम मल्लेश्वरी – १३ मे
७) विजय कुमार – १५ मे
८) योगेश्वर दत्त – १८ मे
९) महाबती सतपाल (खाशाबा जाधवांबद्दल बोलतील) – २० मे