सध्या जगभरात करोना विषाणूचा फैलाव झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक देश करोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेटपटू घरीच आहेत. काही क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. आधी भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हे टिकटॉक व्हिडीओ बनवण्यात आघाडीवर होते. त्यात आता अरॉन फिंच याचीही भर पडली आहे. फिंचने आणखी एक नवा टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे.

आफ्रिदीने निवडला ‘वर्ल्ड कप स्पेशल’ संघ; सचिनऐवजी ‘या’ भारतीयाला स्थान

फिंचने बनवलेल्या नव्या व्हिडीओमध्ये फिंचने डोक्यावर टोपी घातली आहे. व्हिडीओमध्ये त्याचा केवळ चेहराच दिसतो आहे. एक मजेशीर म्यूझीक मागे वाजत असून त्यावर तो केवळ डोक्याने डान्स करताना दिसत आहे. मजेची गोष्ट म्हणजे या व्हिडीओमध्ये जसं-जसं म्यूझीक जलद होतं, तसं फिंचचे चेहरे वाढतात. आधी तीन तर नंतर पाच चेहरे असं व्हिडीओमध्ये दिसतं. तो व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फिंचचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

क्रीडाक्षेत्रात खळबळ! दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूला Coronavirus ची लागण

पाहा हा मजेदार व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Just another day in iso #quarantinelife #bored #bohemianrhapsody #lifeinlockdown

A post shared by Aaron Finch (@aaronfinch5) on

प्रविण कुमारने शेअर केला जुना फोटो, रोहित शर्मा म्हणतो…

या आधीही फिंचने मजेशीर व्हिडीओ बनवले होते. फिंचच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये फिंच एका गाण्याच्या तालावर डान्स करत होता. तो डान्स करताना त्याचा कुत्रा इवी यादेखील त्याच्यासमोरच बसला होता. पण जेव्हा फिंच नाचायला लागला, तेव्हा फिंचचा डान्स पाहून तो कुत्रादेखील तेथून निघून गेला, अशाप्रकारचा व्हिडीओ फिंचने पोस्ट केला होता.

“IPL वर अनेकांचे EMI अन् संसार अवलंबून आहेत, त्याचं काय?”

सुरूवातीला फिंचने आणखी एक व्हिडीओदेखील बनवला होता. एका म्युझिकवर फिंच डान्स करत होता. पण डान्स सुरू असतानाच मागून आवाज आला, “नको… कृपया डान्स थांबवा..” फिंचने डान्स थांबवला आणि पुन्हा नाचायला सुरुवात केली. त्यावेळी पुन्हा तसाच आवाज आला. ते ऐकून अखेर फिंच फ्रेम मधून निघून गेला. हा व्हिडीओ फिंचने इन्स्टाग्रामवर शेअर केला. (व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा) “मी ३० वर्षावरील आहे आणि टिकटॉक वर डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. (पण मला ते जमत नाहीये) त्यामुळे बहुतेक मी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करेन”, असे त्याने मजेशीर कॅप्शन दिले होते.