सिमरनजीत सिंगने दोन गोल केल्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीला ५-४ने पराभूत करून केले. आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत १-३ने पिछाडीवर होता, पण तो दबाव दूर करण्यात यशस्वी झाला आणि आठ मिनिटांत चार गोलसह विजय नोंदवला. भारतीय हॉकी संघाच्या या विजयाबद्दल देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्याला क्रिकेट विश्वातून खूप शुभेच्छाही मिळत आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या दिग्गज व्यक्तींनी भारतीय हॉकी संघासाठी ट्वीट केले आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील कामगिरीसाठी कांस्यपदक मिळवलेच पण सर्वांची मने जिंकली. गौतम गंभीरने भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करत ट्वीट केले. तो म्हणाला, ”१९८३, २००७ आणि २०११ विसरून जा, हे हॉकीचे पदक कोणत्याही विश्वचषकापेक्षा मोठे आहे.”

 

गंभीरच्या ट्वीटवर नेटकऱ्यांचा प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

हेही वाचा – IND vs ENG 1st TEST : दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, रोहित-राहुल मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या गटातील सामन्यात १-७असा दारुण पराभव झाला असला तरी, उर्वरित चार सामने जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये झुंज देऊनही भारतीय संघाला बेल्जियमविरुद्ध पराभव पत्करावा लागला.