टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानुने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून नव्या इतिहासाची नोंद केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. मीराबाईच्या या कामगिरीनंतर अनेकांनी ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

१८९६च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे. पण २०००च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे पदकांचे द्वार खुले झाले अन् आंध्र प्रदेशमधील एका छोटय़ाशा गावातील मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. या यशानंतर मणिपूरसारख्या गावातून आता मीराबाईच्या रूपात आशेची किरणे दिसू लागली आणि आज मीराबाईने सोनेरी कामिगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे.

अनेक दिग्गज व्यक्तींनी मीराबाई चानूला शुभेच्छा दिल्या आहेत.