उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर्मनीने भारतासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशने अगदी शेवटच्या क्षणी जर्मनीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरील प्रयत्न हाणून पाडत भारताला विजय मिळवून दिला.

नक्की पाहा हे फोटो >> पदक कांस्य पण क्षण सुवर्ण… विजयाचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना दिला धीर; पाहा सामन्यानंतरचे मैदानातील खास फोटो

शेवटच्या सामन्यामध्ये भारताने ४ चार गोल खाल्ले असले तरी निर्णयाक क्षणी भारताने श्रीजेशने योग्य बचाव करत भारताची एका गोलची आघाडी टीकवून ठेवत सामना जिंकला. तिसरा क्वार्टर संपला तेव्हा भारताने ५-३ ची आघाडी कायम ठेवली होती. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये लुकॅस विंडफेडरने जर्मनीला लाइफलाइन दिली. पेनाल्टी कॉर्नरमधून त्याने गोल करत जर्मनीचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. जर्मनीने भारतीय गोलपोस्टवर डागलेला गोल पीआर श्रीजेश पायाच्या मधून गेला. हा गोल श्रीजेशला रोखता आला नाही. या गोलमुळे जर्मनी आणि भारतामधील गोलचा फरक अवघ्या एकवर आला.

शेवटच्या क्षणी श्रीजेशची भन्नाट कामगिरी…

सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला. या कामगिरीसाठी श्रीजेशवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अनेकांनी त्यांना ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं म्हटलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

श्रीजेशने अत्यंत महत्वाच्या क्षणी कोणतीही चूक न करता जर्मनीला इक्वलायझर ठरु शकणारा गोल रोखल्याने भारताचे कांस्यपदक निश्चित झाले. या विजयानंतर भारतीय संघातील जवळजवळ सर्वच खेळाडूंनी श्रीजेशला कडकडून मिठी मारली.