भारताचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंशी नीट वागत नाही, त्यांना शिव्या देतो किंवा स्लेजिंग करतो, असे आरोप गेल्या काही दिवसात बांगलादेशच्या खेळाडूंकडून करण्यात आले. धावा काढता येत नसतील तर विराट त्याचा राग गोलंदाजांवर काढतो आणि त्यांना शिव्या देतो, असा आरोप बांगलादेशचा गोलंदाज रुबेल हुसेन आणि अल अमीन हुसेन या दोघांनी लाईव्ह चॅट दरम्यान केले होते. मात्र बांगलादेशचा सलामीवीर इमरुल कयास याने कोहलीच्या स्लेजिंग बद्दल वेगळाच किस्सा सांगितला.

त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन

“२००७ साली मी आणि विराट ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेट शिबिरासाठी एकत्र होतो. त्यावेळी आम्ही महिनाभर एकत्र राहिलो होतो. एकमेकांशी चांगली ओळख झाली होती. पण २०११ साली जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही पहिल्यांदा आमनेसामने आलो, तेव्हा त्याने मी खेळत असताना खूप स्लेजिंग केलं. आमची चांगली मैत्री असूनही त्याचं असं वागणं मला पचनी पडलं नाही. पण मी त्याला याबद्दल काहीच बोललो नाही. मी थेट जाऊन याबद्दल माझा सहकारी तमिम इकबालला सांगितलं. एखादा जशास तसं प्रत्युत्तर देण्यात तो पारंगत आहे. त्यानुसार मैदानात उतरल्यानंतर तमिमने आक्रमकपणे उत्तरं देण्यास सुरुवात केली आणि विराटला गप्प केलं. त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही” असा रोमांचक किस्सा त्याने सांगितला.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

इमरूल कयास

“गेल्या वर्षी बांगलादेश मध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात देखील विराटने इतर सगळ्यांचं स्लेजिंग केलं, पण तो माझ्या वाटेला मुळीच गेला नाही”, असेही त्याने नमूद केले.

रन घ्यायला जमली नाही की विराट गोलंदाजाला शिव्या देतो!

“विराट कोहलीला गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर धाव मिळवता आली नाही की तो गोलंदाजांना शिव्या देतो. विराट गोलंदाजाबद्दल असे काही शब्द वापरतो जे शब्द आपण चारचौघात बोलूही शकणार नाही. तो शिव्या देऊन गोलंदाजाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाजावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करतो. मी ख्रिस गेल, रोहित शर्मा, शिखर धवन आणि इतर अनेक महान फलंदाजांपुढे गोलंदाजी केली आहे. त्यापैकी कोणीही असभ्य भाषेचा वापर करत नाही. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला, तर ते त्या चेंडूचा सन्मान करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर गोलंदाजाला शिव्या देत नाहीत. पण कोहली तसा नाहीये. तो कायम गोलंदाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतो”, असं अमिन अल हुसेनने सांगितलं होतं.