सलामीवीर लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर विंडीजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. सिमन्सने या सामन्यात ६७ धावा केल्या. त्याला एविन लुईस, शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी चांगली साथ दिली

सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने काही चांगल्या संधी दवडल्या. याचा फायदा घेत विंडीजच्या फलंदाजांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एविन लुईस आणि हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?

त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यमस यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कोट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना मोठे फटके खेळताना त्रास होत होता. अखेरीस लोकेश राहुलला माघारी धाडत वॉल्शने भारताला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने रोहित शर्माही माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने कर्णधार विराट कोहली सोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान शिवमने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले अखेरीस ७ गड्यांच्या मोबदल्यात भारताने १७० धावांपर्यंत मजल मारली.

Live Blog

22:27 (IST)08 Dec 2019
लेंडल सिमन्स आणि निकोलस पूरन जोडीकडून विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब

८ गडी राखून विंडीज सामन्यात विजयी, मालिकेतही १-१ ने बरोबरी

22:05 (IST)08 Dec 2019
विंडीजला दुसरा धक्का, शेमरॉन हेटमायर माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ कर्णधार विराट कोहलीने घेतला हेटमायरचा झेल

21:44 (IST)08 Dec 2019
अखेर विंडीजची जोडी फोडण्यात भारताला यश, लुईस माघारी

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात लुईस यष्टीचीत

पहिल्या विकेटसाठी विंडीज सलामीवीरांची ७३ धावांची भागीदारी

21:34 (IST)08 Dec 2019
विंडीज सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

एविन लुईस आणि लेंडल सिमन्स यांचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल

पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

20:46 (IST)08 Dec 2019
भारतीय धावगतीवर विंडीज गोलंदाजांचा अंकुश, १७० धावांपर्यंत भारताची मजल

विंडीजला विजयासाठी १७१ धावांची गरज

20:45 (IST)08 Dec 2019
भारताला सातवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर भोपळाही न फोडता माघारी

शेल्डन कोट्रेलने घेतला बळी

20:38 (IST)08 Dec 2019
अखरेच्या षटकांत विंडीज गोलंदाजांचं सामन्यावर वर्चस्व, जाडेजा बाद

केजरिक विल्यम्सच्या गोलंदाजीवर जाडेजा त्रिफळाचीत, भारताला सहावा धक्का

20:25 (IST)08 Dec 2019
विंडीजच्या गोलंदाजांकडून भारतीय धावगतीवर अंकुश, श्रेयस अय्यर बाद

ज्युनिअर वॉल्शच्या गोलंदाजीवर ब्रँडन किंगने घेतला अय्यरचा झेल

20:11 (IST)08 Dec 2019
कर्णधार विराट कोहलीही माघारी, भारताला चौथा धक्का

केजरिक विल्यम्सने धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात, चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन सिमन्सच्या हाती

१९ धावा काढून कोहली बाद

19:55 (IST)08 Dec 2019
अखेरीस दुबे माघारी, भारताला तिसरा धक्का

फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शिवम दुबेने विकेट फेकली, वॉल्शच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेटमायरने घेतला झेल

शिवमच्या ३० चेंडूत ५४ धावा, या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश

19:53 (IST)08 Dec 2019
शिवम दुबेचं अर्धशतक, भारताचा डाव सावरला

तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने संधीचा फायदा उचलत आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे.

विंडीजच्या गोलंदाजांचा धीराने सामना करताना शिवम दुबेची चौफेर फटकेबाजी

19:39 (IST)08 Dec 2019
भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, रोहित शर्मा त्रिफळाचीत

जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर स्कुपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करणारा रोहित त्रिफळाचीत

रोहितने केल्या अवघ्या १५ धावा

19:17 (IST)08 Dec 2019
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

पेरीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहुल झेलबाद, हेटमायरने घेतला झेल

भारताचा पहिला गडी माघारी

18:38 (IST)08 Dec 2019
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ

भारतीय संघात एकही बदल नाही...

18:38 (IST)08 Dec 2019
असा असेल विंडीजचा अंतिम ११ जणांचा संघ...
18:37 (IST)08 Dec 2019
विंडीजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

संघात एकमेव बदल, दिनेश रामदीनला विश्रांती देऊन निकोलस पूरनला संघात स्थान

Story img Loader