Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Aus : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल ८५ धावांनी हार पत्करावी लागली. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.

धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली. पण बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.

Live Blog

15:52 (IST)08 Mar 2020
ऑस्ट्रेलियाचा विजयी ‘पंच’; भारतीय महिलांची ‘दीन’ कामगिरी

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि टीम इंडिया ८५ धावांनी पराभूत झाली.

15:01 (IST)08 Mar 2020
वेदा कृष्णमूर्ती झेलबाद; भारताचा निम्मा संघ गारद

वेदा कृष्णमूर्ती झेलबाद; भारताचा निम्मा संघ गारद

14:39 (IST)08 Mar 2020
कर्णधार हरमनप्रीत माघारी; भारत संकटात

कर्णधार हरमनप्रीत माघारी; भारत संकटात

14:31 (IST)08 Mar 2020
स्मृती मानधना बाद; भारताचं 'टेन्शन' वाढलं

आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद १८ झाली.

14:24 (IST)08 Mar 2020
मुंबईकर रॉड्रीग्ज शून्यावर माघारी

दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली.

14:14 (IST)08 Mar 2020
सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर शफाली बाद

भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली.

13:56 (IST)08 Mar 2020
हेली-मूनीचा तडाखा; भारतापुढे डोंगराएवढं आव्हान

या सामन्यात सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला डोंगराएवढे आव्हान दिले.

13:54 (IST)08 Mar 2020
पूनम यादवला अखेर यश

यशस्वी गोलंदाज पूनम यादव हिला आज फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण शेवटच्या षटकात तिने एक गडी बाद केला. पूनमने रॅचेल हेन्सला माघारी पाठवले.

13:44 (IST)08 Mar 2020
दिप्तीचे एका षटकात दोन बळी

तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली.

13:32 (IST)08 Mar 2020
सलामीवीर बेथ मूनीचे संयमी अर्धशतक

सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले.

13:30 (IST)08 Mar 2020
धडाकेबाज खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद

धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.

13:10 (IST)08 Mar 2020
एलिसा हेलीचं धमाकेदार अर्धशतक

क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला.

12:56 (IST)08 Mar 2020
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची धडाकेबाज सुरूवात

ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या.

12:23 (IST)08 Mar 2020
पॉप सिंगर केटी पेरीने दाखवला जलवा
12:09 (IST)08 Mar 2020
VIDEO : भारताविरूद्ध पराभव, त्यानंतर ऑस्ट्रेलियन एक्स्प्रेस सुसाट
12:07 (IST)08 Mar 2020
T20 World Cup : यजमान ऑस्ट्रेलियाचा फायनलपर्यंतचा प्रवास
  • ऑस्ट्रेलियाचा प्रवास

साखळी फेरी

पहिला सामना - भारताकडून १७ धावांनी पराभूत
दुसरा सामना - श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय
तिसरा सामना - बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
चौथा सामना - न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय

उपांत्य फेरी - दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी विजय

12:06 (IST)08 Mar 2020
VIDEO : खडतर आव्हानांवर मात करत भारत अंतिम फेरीत
11:57 (IST)08 Mar 2020
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

यजमान ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघात कोणताही बदल नाही. 

Story img Loader