भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) आजपासून रंगणार आहे. अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा निर्धार विराट कोहलीने केला आहे, तर न्यूझीलंडला जगज्जेतेपद जिंकून देण्याचे स्वप्न केन विल्यम्सनने जोपासले आहे. गेल्या दोन वर्षांच्या विविध संघांमधील लढतींनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सांगता क्रिकेटच्या पारंपरिक प्रकारातील विश्वविजेत्यासह होईल. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मात्र हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात होणारा हा सामना भारतीयांना कधी कुठे कसा पाहता येणार आहे यासंदर्भात इंटरनेटवर अनेकजण सर्च करताना दिसत आहे. त्यामुळेच या सामन्याचा आनंद भारतीय प्रेक्षकांना कसा घेता येईल यासंदर्भात जाणून घेऊयात…

नक्की पाहा >> “तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांचा  इतिहास आहे. एकदिवसीय, ट्वेन्टी-२० क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही जगज्जेतेपद देण्यासाठी विविध संघांमधील द्विराष्ट्रीय मालिकांतील गुणपद्धतीनुसार दोन अव्वल संघांमधील अंतिम सामन्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) महत्त्वाकांक्षी योजना आता अंतिम टप्प्यात आहे. भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार हे बिरूद सार्थकी ठरवून विश्वविजेतेपदाची गदा हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत उंचावण्याची विराटला ही उत्तम संधी आहे. ही संधी भारतीय संघ विराटला देणार का हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण हा सामना परदेशात असल्याने सामना नक्की कधी सुरु होणार, तो ऑनलाइन पाहता येईल का?, कोणत्या वाहिन्यांवरुन त्याचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार यासारख्या गोष्टींबद्दल भारतीय चाहत्यांच्या मनात संभ्रम आहेत. याच सामन्याची वेळ, ठिकाण आणि लाइव्ह ब्रॉडकास्टींगबद्दलचे प्रश्न आणि त्यांची उत्तर…

नक्की पाहा >> Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण

> कुठे खेळवला जाणार सामना?

हा सामना दोन्ही संघाचा विचार केल्यास त्रयस्त ठिकाणी खेळवला जाणार आहे. साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे.

> कशी आहे येथील खेळपट्टी?

खेळपट्टीवर चेंडूला वेग आणि उसळी मिळेल. तसेच जसे दिवस पुढे जातील, तसे खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांनाही साहाय्य मिळेल.

नक्की वाचा >> India vs Sri Lanka Series: क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

> किती वाजता सुरु होणार सामना?

सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. तर प्रत्यक्ष खेळाला साडेतीन वाजल्यापासून सुरुवात होईल.

> आमने-सामने रेकॉर्ड काय

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकलेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे.

> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना?

डिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.

> सामन्याचे क्षणोक्षणाचे अपडेट्स आणि ताज्या बातम्या तुम्हाला  loksatta.com च्या क्रीडा सेक्शन ला पाहता येतील.

> संघात कोण कोण?

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

नक्की वाचा >> ‘त्याने’ ५४ चेंडूंमध्ये ९६ धावा करत मिळवून दिला संघाला विजय; आंतरराष्ट्रीय कारकीर्द मात्र संपल्यात जमा

*  न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.