झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा फलंदाज रायन बर्लने शूजच्या स्पॉर्न्सरशिपसाठी एक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुमाने बर्लला शूज पाठवत स्पॉर्न्सरशिपसाठी मदत केली. मात्र, आता बर्लला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड बर्लविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकते. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवरही परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – IPL : जेव्हा मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला दाखवले होते ‘तारे’!

स्थानिक पत्रकार अ‍ॅडम थेओ म्हणाले, की झिम्बाब्वे क्रिकेटमधील काही लोक रायन बर्लच्या ट्विटवर रागावले आहेत. त्यांनी लिहिले, ”मला सांगितले आहे, की झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये काही लोक रायनवर रागावले आहेत. त्यांना असे वाटते, की यामुळे मंडळाची प्रतिमा कलंकित झाली आहे. हे सदस्य रायनवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी हे खूप कठीण पाऊल असेल. बंद दाराच्या मागून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. कदाचित त्याला संघातून वगळण्यात येईल. मला आशा आहे, की मी चुकीचा सिद्ध होईन.”

बर्लचे ट्वीट आणि पुमाची मदत

 

बर्लने सोशल मीडियाद्वारे शूजसाठी प्रायोजक मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याने ट्विटरद्वारे आपली कळकळ व्यक्त केली होती. “आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नाहीत”, असे बर्लने म्हटले होते. बर्लच्या या विनंतीनंतर पुमा (PUMA) कंपनी त्याच्या मदतीला धावली. पुमाने बर्लला स्पॉन्सरशिप दिली असून आता ‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.

हेही वाचा – VIDEO : विराट कोहलीची ‘फ्री किक’ पाहून सुनील छेत्रीने मागितली कोचिंग फीस!