भारताच्या पंत, श्रेयस यांची अर्धशतके; श्रीलंकेपुढे ४४७ धावांचे आव्हान

बंगळूरु : भारताच्या ऋषभ पंतला जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक का मानले जाते, याचा रविवारी पुन्हा प्रत्यय आला. एम. चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर पंतने (३१ चेंडूंत ५० धावा) फटकेबाज अर्धशतक झळकावले. तसेच श्रेयस अय्यरने (८७ चेंडूंत ६७) दमदार कामगिरी सुरू ठेवल्यामुळे भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी ४४७ धावांचे आव्हान ठेवले.

Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात
Priya Punia
भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांतील कसोटी आजपासून
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
India second match of the Top Eight round is against Bangladesh today sport news
रोहित, कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष; भारताचा ‘अव्वल आठ’ फेरीतील दुसरा सामना आज बांगलादेशशी
Suryakumar Yadav Injury During Practice
T20 WC 2024 : भारतीय संघाला मोठा धक्का! सुपर ८ फेरीपूर्वी टी२० जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाजाला दुखापत
India Won Against Pakistan by 6 Runs in New York Marathi News
IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयाचे ‘हे’ तीन ठरले मोठे टर्निंग पॉईंट, अन्यथा पाकिस्तान संघाने मारली होती बाजी
BAN beat SL by 5 Wickets 1st Time in the History of T20 World Cup 2024
T20 World cup मध्ये पहिल्यांदाच बांगलादेशचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, ३८ वर्षीय महमुदुल्लाहचा ‘तो’ षटकार ठरला निर्णायक
Shahid Afridi on India vs Pakistan T20 World Cup 2024
IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “न्यूयॉर्कमध्ये जिंकायचं असेल तर…”

या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर १ बाद २८ अशी स्थिती होती. पहिल्या डावात श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करणाऱ्या जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात लाहिरू थिरीमानेला (०) पायचीत पकडले. मग श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद १०) आणि कुशल मेंडिस (नाबाद १६) यांनी संघर्ष केला.   

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी ६ बाद ८६ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांतच आटोपला. जसप्रीत बुमराने (५/२४) भारतातील कसोटीच्या एका डावात पहिल्यांदाच पाच बळी मिळवले.

त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा (४६), मयांक अगरवाल (२२) आणि हनुमा विहारी (३५) या अव्वल तीन फलंदाजांनी चांगले योगदान दिले. मात्र, कोहली (१३) पुन्हा अपयशी ठरला.  

संक्षिप्त धावफलक

* भारत (पहिला डाव) : २५२

* श्रीलंका (पहिला डाव) : ३५.५ षटकांत सर्वबाद १०९ (अँजेलो मॅथ्यूज ४३; जसप्रीत बुमरा ५/२४, मोहम्मद शमी २/१८)

* भारत (दुसरा डाव) : ६८.५ षटकांत ९ बाद ३०३ डाव घोषित (श्रेयस अय्यर ६७, ऋषभ पंत ५०; प्रवीण जयविक्रमा ४/७८)

* श्रीलंका (दुसरा डाव) : ७ षटकांत १ बाद २८ (मेंडिस नाबाद १६; जसप्रीत बुमरा १/९)

पंतचा अर्धशतकी विक्रम

पंतने दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ २८ चेंडू घेतले. त्यामुळे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आता पंतच्या नावे झाला आहे. त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव (३०) यांचा विक्रम मोडीत काढला.