मर्सिडिझचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने पात्रता फेरीत सुरेख कामगिरी करीत रविवारी होणाऱ्या मलेशियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावले आहे. या कामगिरीसह हॅमिल्टनने फॉम्र्युला-वनमधील पात्रता फेरीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या ब्रिटनच्या ड्रायव्हरच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
पावसामुळे पात्रता फेरीच्या शर्यतीला ५० मिनिटे उशिराने सुरुवात झाली, पण तरीही सेपांग इंटरनॅशनल सर्किटच्या निसरडय़ा ट्रॅकवर हॅमिल्टनने वर्चस्व गाजवले. नव्या मोसमात लागोपाठ दोन वेळा पोल पोझिशन पटकावण्याचा मान हॅमिल्टनने मिळवला. रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने त्याला गाठण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शतांश सेकंदाने मागे पडला. हॅमिल्टनचा सहकारी निको रोसबर्ग तिसरा आला. हॅमिल्टनची ही कारकिर्दीतील ३३वी पोल पोझिशन ठरली.
दुसऱ्या सत्रात कारला अपघात झाल्यानंतरही फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने चौथे स्थान पटकावले. त्याचा सहकारी किमी रायकोनेन सहाव्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात करेल. रेड बुलचा डॅनियल रिकार्डियो पाचवा आला. फोर्स इंडियाचा निको हल्केनबर्ग, मॅकलॅरेनचा केव्हिन मॅग्नसेन, टोरो रोस्सोचा जीन-एरिक वर्गने आणि मॅकलॅरेनचा जेन्सन बटन यांनी अनुक्रमे सातवे ते दहावे स्थान पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%88%e0%a4%b8 %e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9d%e0%a4%bf