पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सदिच्छा दूतांमध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. विराटसह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन, अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन, न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडान मॅक्क्युलम यांच्यासह श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकारा यांना सदिच्छा दूत म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही स्पर्धा अधिकाअधिक चाहत्यांपर्यंत नेण्याची जबाबदारी या सदिच्छा दूतांवर असणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी या उपक्रमाचाही हे सदिच्छादूत भाग असणार आहेत.  २००१ विश्वचषकात भारताच्या विश्वविजयी अभियानाचा अविभाज्य घटक असणाऱ्या कोहलीने विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छादूत होणे ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले. या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयसीसीचे आभार मानतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा