आयपीएलचा १३ व्या हंगमावर रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघानं नाव कोरलं आहे. स्पर्धा संपल्यानंतर मुलतान का सुलतान विरेंद्र सेहवागनं आपल्या शैलीमध्ये समीक्षा केली आहे. सेहवागनं यामध्ये स्पर्धेत छाप सोडणाऱ्या आणि सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावंही सांगितली आहे. ‘विरु की बैठक’ या आपल्या क्रायक्रमात विरेंद्र सेहवागने पंजाबच्या मॅक्सवेल आणि बेंगळुरुच्या डेल स्टेनवर ताशोरे ओढले आहेत. सेहवागने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १० कोटीचा ‘चिअरलीडर’ तर दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला ‘देशी कट्टा’ म्हटला आहे. विरेंद्र सेहवागचा ‘विरु की बैठक’ हा सोशल मीडियावरील कार्यक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

वीरेंद्र सेहवागने यंदाच्या आयपीएलमधील सर्वेत्त कामगरी करणाऱ्या पाच खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, केएल राहुल, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर आणि कॅगिसो रबाडा यांचा समावेश आहे. तसेच प्रभावित करणाऱ्या युवा खेळाडूंचीही सेहवागनं निवड केली आहे. यामध्ये देवदत्त पडिक्कल, नटराजन, ऋतुराज गायकवाड, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि राहुल तेवातिया यांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंवर आपल्या शैलीत टीका केली. फिंच, शेन वॉटसन, ॲरोन फिंच, आंद्रे रसेल आणि डेल स्टेन यांचा समावेश आहे. मॅक्सवेलबद्दल सेहवाग म्हणाला की, १० कोटी रुपयांचा हा चिअरलीडर पंजाबसाठी महागडा ठरला. तर स्टेन गेनला पहिले जग घाबरत होते. पण या आयपीएलमध्ये तो देशी कट्टा झाला आहे. स्टेनच्या गोलंदाजीवर धावा फटकावताना बघितल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, पण एक मात्र निश्चित या कट्ट्याला आता विकत घेणारा बाजारात कोणीही मिळणार नाही. फिंचला मी माझं टोपणनाव दिलं होतं. फिंच विराट कोहलीला विरुसारखी सुरुवात करुन देईल असं वाटलं होतं. मात्र, त्यानं साफ निराशा केली आहे. रसेलचे मसल यंदाच्या हंगामात सुस्तच राहिले. व्हिडीओच्या अखेरीस सेहवागनं यंदाच्या आयपीएलमधील आपली ड्रीम टीमही निवडली आहे.

यंदाच्या आयपीएलमधील विरेंद्र सेहवागची ड्रीम टीम –

केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार, विराट कोहली(कर्णधार), डेविड वॉर्नर, एबी डिव्हिलियर्स, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, राशिद खान

१२ वा खेळाडू – जोफ्रा आर्चर
१३ वा खेळाडू – इशान किशन</p>

Story img Loader