पीटीआय, मुंबई : भारतीय डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना अपेक्षेप्रमाणे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पर्वासाठी सोमवारी झालेल्या खेळाडू लिलावात प्रमुख आकर्षण ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सर्वाधिक ३.४० कोटी रुपयांच्या बोलीसह मानधनाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. मानधनासह भारताच्या १० खेळाडू कोटय़धीश झाल्या. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये आता महिला क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्टय़ा अधिक सक्षम होण्याची संधी लाभली आहे.  

भारताची उपकर्णधार मानधनाची सध्याच्या घडीला जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत मानधना तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे लिलावात तिच्यावर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि तसेच झाले. मानधनासाठी बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेरीस बंगळूरु संघाने मानधनावर ३.४० कोटी रुपयांची विजयी बोली लावली. बंगळूरुने ऑस्ट्रेलियाची तारांकित अष्टपैलू एलिस पेरीलाही १.७० कोटी रुपयांत खरेदी केले. ‘‘मानधना आणि पेरी या दोघी उत्कृष्ट खेळाडू असल्याचे सर्वानाच माहिती आहे. आम्ही काही खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले होते. या दोन खेळाडू आमच्या संघाकडून खेळणार असल्याचा खूप आनंद आहे,’’ असे बंगळूरु संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन म्हणाले. तसेच मानधनाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येईल, असेही हेसन यांनी संकेत दिले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू
Highest Paid Indian Singer AR Rahman
भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला मात्र मानधनापेक्षा जवळपास अर्ध्या किमतीत मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले. मुंबईने हरमनप्रीतवर १.८० कोटी रुपयांची विजयी बोली लावली. डावखुरी फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या दीप्ती शर्माला २.६० कोटी रुपयांत यूपी वॉरियर्स संघाने खरेदी केले. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला २.२० कोटी रुपयांच्या विजयी बोलीसह दिल्ली कॅपिटल्सने संघात समाविष्ट करून घेतले. दिल्लीनेच शफालीला २ कोटी रुपयांत खरेदी केले. रिचा घोष (१.९० कोटी, बंगळूरु) आणि यास्तिका भाटिया (१.५० कोटी, मुंबई), अष्टपैलू पूजा वस्त्रकार (१.९० कोटी, मुंबई), वेगवान गोलंदाज रेणुका सिंह (१.६० कोटी, बंगळूरु) यांच्यासाठीही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या पर्वासाठीच्या लिलावात पाचही संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी १२ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा होती. प्रत्येक संघाला किमान १५ खेळाडू खरेदी करणे अनिवार्य होते.

स्किव्हर-ब्रंट मुंबईच्या संघात

इंग्लंडची नॅटली स्किव्हर-ब्रंट आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ली गार्डनर या अष्टपैलू संयुक्तरीत्या सर्वात महागडय़ा परदेशी खेळाडू ठरल्या. स्किव्हर-ब्रंटला मुंबई इंडियन्स संघाने ३.२० कोटी रुपयांत खरेदी केले. आघाडीच्या फळीतील फलंदाज आणि मध्यम गती गोलंदाज असा स्किव्हर-ब्रंटचा लौकिक आहे. गार्डनरवर गुजरात जायंट्सनेही ३.२० कोटी रुपयांची विजयी बोली लावली. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनीला २ कोटी रुपयांत गुजरात संघाने खरेदी केले.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), रेणुका सिंह ठाकूर, रिचा घोष, एरिन बर्न्‍स (ऑस्ट्रेलिया), दिशा कसाट, इंद्राणी रॉय, श्रेयांका पाटील, कनिका अहुजा, आशा शोबाना, हेदर नाइट (इंग्लंड), डेन व्हॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झंझाड, मेगन शूट (ऑस्ट्रेलिया), सहाना पवार
  • यूपी वॉरियर्स : सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), शबनीम इस्माईल (दक्षिण आफ्रिका), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पाश्र्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस (ऑस्ट्रेलिया), देविका वैद्य, लॉरेन बेल (इंग्लंड), लक्ष्मी यादव, सिमरन शेख
  • गुजरात जायंट्स : अ‍ॅश्ली गार्डनर (ऑस्ट्रेलिया), बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकली (इंग्लंड), अ‍ॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), स्नेह राणा, एस. मेघना, जॉर्जिया वेरहॅम (ऑस्ट्रेलिया), मानसी जोशी, हेमलता, तनुजा कन्वर, मोनिका पटेल, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी
  • दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिझान काप (दक्षिण आफ्रिका), तितास साधू, अ‍ॅलिस कॅप्सी (इंग्लंड), तारा नॉरिस (अमेरिका), लॉरा हॅरिस (ऑस्ट्रेलिया), जसिया अख्तर, मिन्नू मणी, तानिया भाटिया, जेस जोनासेन (ऑस्ट्रेलिया), स्नेहा दीप्ती, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडल
  • मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर, नॅटली स्किव्हर-ब्रंट (इंग्लंड), अमेलिया कर (न्यूझीलंड), पूजा वस्त्रकार, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम (ऑस्ट्रेलिया), इझी वोंग (इंग्लंड), अमनजोत कौर, धारा गुज्जर, शैका इशक, हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), क्लोइ ट्रायॉन (दक्षिण आफ्रिका), हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतीमणी कलिता, नीलम बिश्त

भारताच्या कोटय़धीश खेळाडू

  • स्मृती मानधना : ३.४० कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु)
  • दीप्ती शर्मा : २.६० कोटी (यूपी वॉरियर्स)
  • जेमिमा रॉड्रिग्ज : २.२० कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
  • शफाली वर्मा : २ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
  • रिचा घोष : १.९० कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु)
  • पूजा वस्त्रकार : १.९० कोटी (मुंबई इंडियन्स)
  • हरमनप्रीत कौर : १.८० कोटी (मुंबई इंडियन्स)
  • रेणुका सिंह ठाकूर : १.५० कोटी (रॉयल चॅलेंजर्स  बंगळूरु)
  • यास्तिका भाटिया : १.५० कोटी (मुंबई इंडियन्स)
  • देविका वैद्य : १.४० कोटी ( यूपी वॉरियर्स)