इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीनाथ यांच्यासह १०९७ क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे.

लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही २७ खेळाडूंची यात नोंद आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचाही या लिलावात समावेश आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते.

हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इनग्राम यांचा दोन कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह समावेश करण्यात आला आहे.

*  २०७ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू उपलब्ध असून, यात २१ भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

*  ८६३ बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मोठा भरणा असून, यात ७४३ भारतीय व ६८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 cricketers including shakib and srinath for ipl auction abn
Show comments