सध्या सोशल मीडियावर 10yearschallange मोठ्या प्रमाणात गाजत आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती आणि सामान्य नागरिकही आपला १० वर्षांपूर्वीचा म्हणजेच २००९ मधील फोटो आणि आताचा फोटो एकत्रितपणे सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामध्ये आता आयसीसीने उडी घेतली आहे. आयसीसीने धोनीचा २००९ मधील आणि २०१९ मधील षटकार मारल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

अॅडलेड एकदिवसीय सामन्यात धोनीने ५४ चेंडूत केलेल्या ५५ धावांच्या खेळीची सर्वच स्तरावर स्तुती होत आहे. धोनीच्या या दमदार खेळीला आयसीसी आणि बीसीसीआयने सलाम केला आहे. सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या #10YearChallenge नुसार धोनीचा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. ‘२००९ विरूद्ध २०१९, धोनीची षटकार लगावण्याची शैली आजही तशीच आहे.’ आयसीसीने आपल्या ट्विटरवर धोनीबद्दल स्तुती करताना लिहले आहे.


‘ दहा वर्षापूर्वी हा खेळाडू जसा खेळत होता, त्याच शैली आणि कौशल्याने आताही खेळत आहे, अशा प्रकारे दोन फोटो पोस्ट केले आहे. आयसीसीने धोनीशिवाय अन्य क्रिकेटपटूंचेही फोटो पोस्ट केले आहेत.


ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या सामन्यात संथ खेळीमुळे धोनीवर टीका झाली होती.मात्र दुसऱ्या सामन्यात धोनीने ५४ चेंडूत ५५ धावांची खेळी करत टीकाकारांची तोंड बंद केली.

Story img Loader